नशिराबाद टोल नाक्यावर झोल : बोगस पावत्यांंची पोलखोल
दिनांक : २१ जुलै २०२२ विशेष प्रतिनिधि
जळगांव: जळगाव भुसावळ दरम्यान नशिराबाद टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आला असून घटनास्थळावर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या गैरप्रकाराबाबत आज पोलिस अधिक्षकांसह प्रशासनाच्या सर्व पातळीवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या फलस्वरुप आज कारवाई करण्यात आली आहे.
ठरवून दिलेल्या मशिनमधून वाहनधारकांना पावती देण्याऐवजी दुस-याच मशिनमधून पावती देऊन झोलझाल सुरु असल्याचे दिसून आले आहे. संबंधीत टोल टॅक्स वसुल करणा-या ठेकेदारावर प्रचलीत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली होती. दीपककुमार गुप्ता यांच्या समवेत सहा जणांचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.