वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न
अमळनेर (नुर खान) येथील वंचित बहुजन आघाडी अमळनेर तालुका कार्यकारणीची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. जिल्हा अध्यक्ष प्रमोद इगळे यांच्या नेतृत्वाखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी विभागीय अध्यक्ष रविकांत वाघ यांनी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. व या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार निवडून कसे येतील या बाबत रणनीती आखण्यात आली.
त्याचसोबत बाराबलुतेदारांना घेऊन उमेदवार निवडून येत असल्याची अनेक उदाहरणे उपस्थितांनी दिली. व यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढवला. तर वैभव शिवतुरे यांनी गट व गणांमध्ये तयारी कशी करावी ? याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दाजिबा गव्हाणे यांनी उमेदवार निवडून येण्यासाठी तन मन धनाने कामाला लागु असे कार्यकर्ताच्या वतीने आश्वासन दिले. यावेळी बापु भामरे, भिमराव वानखेडे, दिनेश बिऱ्हाडे, नाना पवार, मोहन बैसाणे, अनिकेत ब्रम्हे, सुरसिग राजपुत, पुनमचंद निकम, सोमा कढरे, रवि कढरे, वाल्मिक मैराळे, महाले, चंद्रकांत सोनवणे, संदीप सैदाणे, संदीप शिरसाठ आदी कार्यकर्ते होते.