महाराष्ट्र
बेमोसमी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) शेतकऱ्यांचा पाचवीला पुजलेला बेमोसमी पाऊस हा दरवर्षी मार्च महिन्यात कमी अधिक प्रमाणात येत असतो. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पिकांची प्रतिकारक शक्ती कमी होते आणि उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होत असून मका पिकावर मर रोगाचा तर ज्वारी पिकावर मावा चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शेतकऱ्यांचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे हे जवळपास निश्चित आहे.