महाराष्ट्र

गोंडगाव येथे वीज तक्रार निवारण परीक्षण

गोंडगाव (सतीश पाटील) महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ भडगाव तर्फे कृषी संजिवनी घरगुती ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र आज राम मंदिर गोंडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांचे तीन एचपीचे बिल असलेलं कनेक्शन धारकांसाठी पाच बिल येत आहे अशा अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या तर काही घरगुती ग्राहकांच्या आवाजवी बिला संदर्भात तक्रारी आल्या होत्या. मात्र यापुढे सर्व निवारण व्यवस्थित होईल नागरिकांनी बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन भडगाव महामंडळ अभियंता दहिवले यांनी केले आहे.

मंजूर भारपेक्षा डीपीवर अधिक लोड असल्याने काही शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नवीन डीपी लवकरच मंजूर होईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तर काही शेतकऱ्यांच्या शेतावरचे पोल जीर्ण झाले असून त्यांची लवकरच बदली केली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. यावेळी वायरमन मोरे, लाईनमन अनिल महाजन, गौरव पाटील, आधी कर्मचारी हजर होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे