संस्कार टी.व्ही भजन गायक देवेंद्रसिंह ठाकुर यांना खा. रक्षाताई खडसे यांचा हस्ते गौरव प्रशस्तिपत्र
भुसावळ (अखिलेश धिमान) भुसावळ शहरातील रहिवासी व संगीत क्षेत्रात ख्यातीप्राप्त संस्कार टी.व्ही. चैनल भजन गायक यांनी भारतभरा सह संपूर्ण जळगांव जिल्हात आज पर्यंत १०३७ सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण केले असुन संस्कार टी.व्ही. चैनल माध्यमातून विविध भजनांने लोकांना संगीत व भजनाची आवड लावली आहे तसेच़ कोरोना पार्श्वभूमी वर २०२० साली लागलेल्या लाॅकडाऊन मुळे संगीत कलाकारांवर आलेल्या आर्थिक संकटाकाळी त्यांने त्यांचे युट्यूब चैनल devendrasinghthakur24 च्या माध्यमातून ३७७ संगीतबद्ध मालिकेप्रमाणे रामायण वाचन लोकांपर्यंत पोहोचविले व त्या पासुन मिळविलेली सन्मान राशि भुसावळ शहरातील संगीत कलाकारंना सन्मानपूर्वक प्रत्येकी आर्थिक सहाय्य म्हणुन दिले. व त्या नेहमी समाजकार्यात अग्रसर असुन भुुुसावळ व जळगाव जिल्हाचे नाव गौरन्वित करित आहे. त्या अनुषंगाने त्यांचे कौतुक करत आज रोजी खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते गायक देवेंद्रसिंह ठाकुर यांना गौरव प्रशस्तिपत्र देण्यात आले.