महाराष्ट्र
मालपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व जयंती उत्साहात साजरी
मालपुर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दोन वर्षांपासून कोरोना काळात बाबासाहेब आंबेडकर यांच्यी जयंती झाली नाही म्हणुन यावर्षी सालाबादप्रमाणे जयंती व मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे व संध्याकाळी मिरवणुक काढण्यात येणार आहे. भिम सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धन सिंह रावल, युवा नेते हेमराज नाना पाटील (जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी), सदाशिव गोसावी उपसभापती पं.स. प्रकाश तात्या पाटील, मच्धिंद्र शिंदे सरपंच मालपुर, संतोष भावराव चव्हाण उपसरपंच मालपुर, पत्रकार अडगाळे, मनोज कोळी, सदाशिव भलकार, प्रशांत अडगाळे, समाधान धनगर, गोपाल कोळी व सर्व भिम सैनिक व मालपुर ग्रामस्थ उपस्थित होते.