सोयगाव तालुक्यात लसीकरण मोहीम जनजागृती
सोयगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने सोयगाव तालुक्यात लसीकरण मोहीम जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत नटराज पंचरंगी लोककला पथक, समाज प्रभोधनकार विष्णू विनायकराव मापारी आणि सहकारी यांनी कलापथकाद्वारे शासनाने दिलेल्या बनोटीतांडा वरठाण, काळदरी, दस्तापूर, शिंदोळ, नांदगाव, धनवट, पळसखेडा, गोदेगाव या गावामध्ये कोविड-१९ लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यात आली.
बनोटी तांडा येथे बंजारा समाज असल्यामुळे समाज प्रबोधनकार विष्णू मापारी यांनी गोर बंजारा भाषेत त्यांना सांगितले की, म्हारी याडी बापून विनंती छ की, सारी सारी स्वतः जानातेन सरकारी दवाखानेम लस लेलो सारी लस अच्छी छ काळजी पूर्वक ले लो म्हारी सारणे विनंती छ असे सांगताच उपस्थितांनी त्यांचे विचाराचे स्वागत केले व जवळच्या बनोटी केंद्रावर लस घ्यायला गेले.
यावेळी सरपंच मुरलीधर पाटील, ग्रा. पं. सदस्य हिराबाई चव्हाण हजर होते. वरठाण येथील कार्यक्रमात सरपंच अनिल सोळंके, ग्रा. पं. सदस्य प्रदीप शिंदे, नंदू बापू सोळुंके, पळसखेडा येथे सरपंच राधाबाई रेकनोद, पो. पा. विठ्ठल घोंगडे, दस्तापूर काळदरी सरपंच मनोज बयास, गोंदेगाव सरपंच वनमाला निकम, उपसरपंच दीपक अहिरे, शिंदोळ येथे ग्रामसेवक एस पी मोरे, सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, उपसरपंच राहुल घोगडे, नांदगाव येथे पो. पाटील उपस्थित होते. आमखेडा येथे सोमवारी तहसीलदार व नायब तहसीलदार सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सोनवणे, तहसीलचे जहागीरदार, संभाजी बोरसे व कर्मचारी उपस्थित होते.
अफवांवर विश्वास ठेऊ नका लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तिसरी लाट जर येऊ द्यायची नसेल तर १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाला प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून लस घेणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. लस घेतली नाही तर, अनेक बंधने येत आहे, असा मोलाचा सल्ला लोककलावंत विष्णू मापारी आणि सहकारी यांनी दिला. प्रत्येक वेळी कोविड-१९ चे सर्व नियम पाळत कार्यक्रम संपन्न झाले.