महाराष्ट्र
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बु येथे भिम गिताचा प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ (प्रमोद बावस्कर) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बु येथे भिम गिताचा प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु येथे विश्वभूषण प. पुज्य क्रांतिसुर्य कायदेतज्ञ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बी.आर प्रसुत सूरसंगम विदर्भ म्युझीकल ग्रुप यांचा गायनाचा कार्यकम पिंपळगांव बु. आंबेडकर नगर बौद्ध बांधव यांनी आयोजन केले आहे.
तसेच दि .१४ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी 6 ते १० वाजेपर्यंत धम्म दिप बुद्ध विहार येथे पार पडणार असल्याचे आयोजक सामिती यांनी सुचीत केले असता कार्यक्रमाला आपली सर्वाची उपस्थीती द्या अशी विनती करण्यात आली आहे.