महाराष्ट्र

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमीटीची बैठक संपन्न

भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे निर्बंध असल्याने सर्व सण- उत्सव साजरे करण्यात बंदी होती.कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने प्रशासनाकडून सण-उत्सव साजरे करण्याची परवानगी मिळाल्याने आगामी येणारे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

आगामी येणाऱ्या सणाच्या पाश्वभूमी वर उपविभागतील कार्यकर्त्यांची व शांतता कमिटीची बैठक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार रोजी सायंकाळी संपन्न झाली.

सदर बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांना १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भात काही सूचना देण्यात आल्या त्यात मिरवणूक वेळेमध्ये काढाव्या.मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरात अनधिकृत बॅनर लागणार नाही.

मिरवणुकी दरम्यान दारू पिऊन तसेच नशा करून कोणी गालबोट लावत असेल त्याबाबत पोलिसांना माहिती दयावी. मिरवणूक ठरवून दिलेल्या मार्गाने काढावी. विना परवानगी मिरवणूका निघणार नाही. मिरवणुका वेळेवर सुरू करून वेळेत सपंतील. तसेच जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादी ठरवून दिल्याप्रमाणे रात्री १२ वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

याप्रसंगी प्रभाकर हॉलला शांतता कमेटी बैठकीला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन, तालुका पोलीस स्टेशनचे विलास शेंडे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाकूर न.पा.प्रशासनाचे परवेज अशांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे