इंधन बचत ही काळाची गरज : प्राचार्य बी एम भामरे
साक्री : गगनाला भिडलेले भाव व येत्या काही वर्षात संपुष्टात येणारे जिवाश्म इंधनाचे साठे, यान्चा विचार केला तर इंधन बचत करने हे पूर्णतया वाहनचालक व तान्त्रीक कर्मचा-यांच्या हातात असुन, इंधन बचत ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य बी. एम.भामरे यांनी केले. साक्री एस. टी.आगारातील इंधनबचत मासिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष व प्रवसी महासंघाचे सहसचिव प्राचार्य बी.एम.भामरे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री आगाराचे आगारप्रमुख किशोर महाजन हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश भाऊ पारख, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक पी.झेड्.कुवर, कार्यशाळा अधिक्षक योगेश शीघाने ,लेखापाल हेमंत बहिरम व कामगार संघटना सचिव टी.के. पठाण उपस्थित होते.

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात पुढे बोलताना प्रा बी.एम्.भामरें म्हणाले की, एस् टी महामंडळाच्या ज्या गाडया डिझेल या आपल्याला आयत कराव्या लागत असलेल्या इंधनावर चालतात. त्याचे साठे मर्यादीत असुन ते साठे काही वर्षानी संपणार असतानाच त्यामुळे पर्यावरण संतूलनही बिघडणार असल्याचा धोका निर्माण होणार आहे. याही बाबीचा विचार करुन इंधनाचा एक- एक थेंब वाचवने नितांत गरजेचे आहे व हे काम चलकानी अपल्या आगराची बस ही माझी घरची बस आहे असे समजून चालवली तर सहज शक्य असल्याचा आशावाद व्यक्त करत, इंधनबचतही केवळ मासिक साजरा करण्यापूरती न करता वर्षभर करण्याचेही आवाहन केले.

या प्रसंगी सुरेश पारख म्हणाले की, इंधनाबाबत आपण परावलंबी असल्याने आपल्याला फार मोठी आर्थिक झळ सोसावी लागते आहे. यासाठी आपल्या आगारातील बस चालकांनी इंधनाची काटकसर करावी असे आवाहन केले व कांम बंद आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत कामी रुजू होऊन समान्य प्रवास्यांची गैरसोय टाळावी असे आवाहन प्रवासी महासंघाचा अध्यक्ष या नात्याने केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात आगार प्रमुख किशोर महाजन म्हणाले की, इंधनबचत ही पुर्णपणे चालकांच्या ड्रायव्विंग ह्याबिटवर अवलंबून असतं म्हणून चालकांनी सिग्नल वर अथवा ज्यांम ट्राफीक्ला गाडी बंद ठेवावी व तंत्र शुध्द पध्ह्तीने गाडी चालवावी तसेच तान्त्रीक कर्मचा-यांनी आपल्या गाडया तंदुरुस्त ठेवण्याचे आवाहन केले.व उदाहरण देताना आपल्या आगारात जर चाळीस चालक आज प्रत्येकी एक लिटर डिझेल वाचवतील तर आगाराला मासिक किमान सव्वा लाख रुपये नफा मिळू शकतो असे स्पस्ट केले.व त्यासाठी प्रत्येक कर्मचा-यांने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

11एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधी सठी साजरा होत असलेल्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी इंधन बचत मासिकाचे उद्घाटन प्रसंगी योगेश शिघाने यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन टी.के.पठाण यानी केले.




