शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदे च्यावतीने तंट्या भिल शहीद दिनी आठवणीला उजाळा
शिंदखेडा (प्रतिनिधी) येथील आदिवासी एकता परिषद च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शहीद तंट्या भिल यांच्या शहीद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक फुले यांनी प्रतिमा पुजन केले.
यावेळी नाना कुंवर यांनी सांगितले की, ब्रिटीश सरकारच्या काळात आदिवासी समाजाचे नेते तंट्या भिल यांनी लढा दिला त्यांचे कार्य महान होते. तरी आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. तो बोध घ्यावा. तसेच भुपेंद्र देवरे, गुलाब सोनवणे, सुरेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रंसगी तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद्र देवरे, सुरेश सोनवणे, किशोर ठाकरे, जिभाऊ फुले, आप्पा सोनवणे, पंकज फुले, शानाभाऊ सोनवणे, रणजीत बागुल, ज्ञानेश्वर मोरे, अमर भिल, उदय भिल, गोपाल मालचे, अनोक महाराज, राजु पवार, कैलास सोनवणे, बबलू मोरे, अजय मालचे यांच्यासह तालुक्यातील शाखाप्रमुख सदस्य व आदिवासी समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होते.