धुळे शहरातून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्र्क चालकास अटक ; चाळीसगाव रोड पोलिसांची कार्यवाही
धुळे (विशेष प्रतिनिधी) धुळे शहरातून अवैध गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक चाळीसगाव रोड ठाण्यातील पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये ६४ लाख लाख ५४ हजार ८०० हजार रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा होता. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला असून ट्रक चालकास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी सपोनि संदीप बी पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मालेगाव कडुन जळगाव कडे ट्रक क्रमांक एम एच १५ जी व्ही ९७४१ मध्ये विमल पान मसाला व तंबाखु जन्य पदार्थ भरून जात आहे. या मिळालेल्या माहितीवरून पोउनि एन जी चौधरी व पोलीस स्टाफ त्यांच्या पथकाला आदेशित केल्यावरून हॉटेल द्वारका लॉज समोर सापळा रचुन सदर मालट्रक थांबविण्याचा इशारा केला. परंतु सदर चालकाने पोलीस असल्याचे पाहून ट्रक न थांबविता पळुन गेला सदर ट्रकचा पथकाने पाठलाग करुन मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक ०३ लगत हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ पकडला व ट्रकवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख हारुन शेख हुसेन (वय ४८ वर्षे, व्यवसाय चालक, रा. गल्ली नं ९ आझादनगर, मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक) असे सांगुन त्याचे सोबत असणाऱ्या क्लिनरला देखील त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद समील मोहम्मद सलीम (वय १९ वर्षे, रा. कमालपुरा मालेगाव जि. नाशिक) असे सांगुन सदर मालट्रकमध्ये मालाबाबत विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. यावेळी मालट्रकमध्ये खाकी रंगाचे कार्टुन व सफेद रंगाच्या गोण्या असा एकूण ६४ लाख ५४ हजार ८०० हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी चालक व क्लिनरविरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि/ एन जी चौधरी हे करीत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक प्रविण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोउनि एन.जी.चौधरी, पोउपनि नासिर पठान, हेकॉ पंकज चव्हाण, हेकॉ कैलास वाघ, पोना भुरा पाटील, पोना अविनाश पाटील, पोना संदीप कढरे, पोकों हेमंत पवार, पोकॉस्वप्नील सोनवणे, पोकॉ सोमनाथ चौरे, पोकॉ प्रशांत पाटील, पोकॉ शरद जाधव व चालक असई किरण राजपुत यांनी केली.