चोपडाविशेष

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो प्राषन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही – महामानव डॉ. भिमाई

चोपडा (मयुरेश्वर सोनवणे) “मैं उन शोषितों के लिए सेवा में अपने जीवन का उत्सर्ग कर दूँगा,जिस में मैं पैदा हुआ ,जिन लोगों के बीच रहकर पैदा हुआ,मैं अपने उत्तर दायित्व में एक इंच भी पीछे नही हटूंगा” अशी सिंह गर्जना करणारे दलित समाजातील प्रथम बरिस्टर, भारतात नामशेष झालेल्या बौद्ध धर्माची स्थापना करणारे प्रथम पुरुष,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी सुभेदार व भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.

अन्यायाला परंपरा नसते ती चालत आली म्हणून चालवा ही विचारसरणी रानवट आहे.कार्याच्या मुळाशी सत्य असेल तर यशप्राप्ती नक्की.त्यात असते.हिंसा करणे म्हणजे नुसते जीवन घेणे नव्हे तर दुसऱ्या प्राण्याचे मन व शरीर यांस इजा पोहचवीने होय.हक्क लढून व संघर्ष करून मिळवावे लागतात म्हणून शिका,शिकवा व संघटित व्हा,शिक्षण हे आपल्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे, कानमंत्र बाबासाहेबांनी दिला.

महाराचं पोर बेटया लई हुशार,बेटया लई हुशार….
साऱ्या जगात असं नाही होणार…।
अन बघ बघ बघ
अंधारात आम्हासनी वाट दाखविली…
भोळी जनता त्यांनी जागृत केली….।
देव माणसावानी ज्ञान भरलया चिकार….
बेटया भरलय चिकार….।
साऱ्या जगात असं नाही होणार.
बघ बघ बघ…
गव्हर्नरा व्हाइस गोरा अधिकारी…
त्याच्या संगे गॉट मॅट बोलतोय भारी….।
इंग्लिश माणसावाणी घालून विजार,बेटया घालून विजार….।
साऱ्या जगात असं नाही होणार..बघ बघ बघ बेटया लई हुशार..।।

असं त्यांच्या स्वभावाच,नेतृत्वाचं, मार्गदर्शनाचं,हुशारीचं वर्णन शाहीर हेगडे यांनी पोवाड्यात केलेले आहे. बाबासाहेबांचे कायदे शास्त्रातील पांडित्य, संविधानिक प्रतिभा,राष्ट्रीय वृत्ती,नितिमत्तेतील आस्था हे सर्व गुण स्वातंत्र्यसेनानींनी वेचले आणि त्यांच्याकडे संविधानिक राज्य घटना लिखाणाचा आग्रह धरला.रात्र दिवस एक करून कोणत्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही.समान हक्क दर्शवत राज्यघटना देशाला अर्पण केली.

शाळा म्हणजे सर्वोत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने होत.शाळा, शिक्षक व शिक्षण या तीनही बाबी जबाबदारीच्या आहेत.शिक्षक हा निपक्षपाती उदात्त थोर मनाचा असावा.हितदक्ष व सारथी असावा असे मत बाबासाहेबांचे शिक्षकांविषयीचे होते.बापासोबत आईचे कार्य करून दाखवले म्हणून समाज भिमाई नावाने साहेबांना ओळखतो.

बौद्ध धर्मात ज्या व्यक्तीच्या संस्कारिक इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.जीवन पिडे पासून , जीवनचक्र पासून मुक्त होवून पुन्हा जन्म घेत नाही.या क्रियेला परिनिर्वाण असे संबोधले जाते. म्हणून ६ डिसेम्बर डॉ. बाबासाहेबांच्या पुण्यस्मरण दिवसाला संपूर्ण भारत देश महापरिनिर्वाण दिवस संबोधतो. दलितच नाही सर्व समाजाला माणुसकीचे तसेच समानतेचे दर्शन घडवणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन!!!

मयुरेश्वर रोहिदास सोनवणे
उपशिक्षक,बालमोहन विद्यालय, चोपडा

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे