वचनपूर्ती करणारा नेता …..
सोयगांव (विवेक महाजन) उभ्या आयुष्यात राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्व देणारा नेता म्हणजेच राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार होय. त्यांनी नेहमीच दिलेला शब्द पळाला आहे. त्याचीच प्रचिती शिवस्मारक आणि भीमतीर्थ निर्माण करण्याची भीष्म प्रतिज्ञा केल्यानंतर येते. निवडणुकीच्या काळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक तयार करण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली आहे. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या जाणत्या राजाचा इतिहास आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महान कार्य जगासमोर यावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि ‘भीम तीर्थ’ उभारण्याचे. काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसरख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराजांचे युद्धकौशल्य, सुराज्य, अष्टप्रधान मंत्रीमंडळ, त्यांची हस्तलिखीते, शस्त्रास्त्रे असे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत करणारे साहित्य एकाच ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळणार आहे. तसेच आधुनिक भारताचा पाया रचणारे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महानकार्य जगाला कळावे त्यामुळे हे दोन्ही स्मारक सर्व दृष्टीने परिपुर्ण असावे यासाठी इतिहास संशोधक, लेखक, वास्तुकला, शिल्पकार तसेच या विषयातील सगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हि स्मारके पूर्ण करणार आहेत. यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाकडून १५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या स्मारकाच्या निर्माणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे २७ डिसेंबर रोजी पर्यटन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १० एकर जागा देण्याचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
देखभाल दुरुस्तीच्या निधीसाठी प्रस्ताव…..
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या परिसरात फर्दापूर येथे हे दोन्ही स्मारक साकारणार आहेत. टप्प्या टप्प्यात तयार होणारे दोन्ही स्मारक प्रत्येकी दहा एकरच्या परिसरात उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २५ कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे. या प्रकल्पांच्या भविष्यातील देखभाल दुरुस्तीसाठी खासगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मिळणारा निधी वापरण्यात येईल, त्याच प्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतील १० टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
असे असेल शिवस्मारक…..
• अजिंठा या जागतिक वारसा असलेल्या जगप्रसिद्ध लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक
• बालपण , मावळ्यांची माहिती, किल्ल्यांची माहिती, अष्टप्रधान मंडळ यांची माहिती देणारे दालन
• स्मारक परिसरात महाराजांचा अश्वरुढ भव्य पुतळा
• अद्यावत ग्रंथालय, प्रशासनिक संदर्भाचे ग्रंथ, महाराजांची हस्त लिखीते, युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे यांचे प्रदर्शन
• महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यासाठी मुक्त आकाश रंगमंच (ॲम्फीथिएटर),3डी ऑडीयो व्हिज्युअल , लेझर शो.
असे असेल भीमतीर्थ…..
• अजिंठा या जागतिक वारसा असलेल्या जगप्रसिद्ध लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिकृती
• लेसरशो द्वारे डॉ. आंबेड्करांचा जीवनपट दाखविला जाणार
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे सर्व साहित्य, लिखाण, हस्तलिखितयांचे भव्य दालन असणार आहे. तसेच जगाला शांती आणि बंधू भावाचा संदेश देणार्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरही सर्व माहिती, प्रसंग या स्मारकात असणार आहेत.