महाराष्ट्रविशेष

बस….फक्त न फक्त पुतळ्यांचे दोंडाईचा शहर

गावातील इतर स्मारकांनाही सी.सी.टी.व्ही-सिक्युरिटी व चेहऱ्यावर उजेड म्हणून मर्क्युरी लाईट लावण्याची गरज

दोंडाईचा (प्रतिनिधी) बस….फक्त न फक्त पुतळ्यांचे दोंडाईचा शहर, अशी परिस्थिती गावात सध्या ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्यावर म्हणावी लागेल. कारण पुतळे म्हणजे दोन प्रकारचे असतात. एक प्रत्येक माणसाला जीवनात पदोपदी प्रेरणा देतात तर दुसरे प्रेरणाशुन्य असतात. पुतळे म्हणजे निर्जीव वस्तु नाही. तर जीवंत असल्यावरही ज्यांची आचार-विचार, चांगल्यला चांगले व वाईटाला वाईट म्हणायची ज्यांची मानसिकता मरून जाते. त्यांना जींवतपणीच काही जण पुतळे बनवून टाकतात.


आम्हाला येथे सर्वाच्या बाबतीत म्हणायचे नाही, अनेकजण अपवाद निघू शकतात. मात्र दोंडाईचा शहरात असे चालते-बोलते अनेक पुतळे आहेत. जे स्वतः कधीच खरेला खरे-अन्यायाला अन्याय म्हणत नाही. त्यासाठी त्यांना दुसऱ्याच्या चेहऱ्याची-आवाजाची, कद- काठीची सुरूवातीपासुन सवय झाली आहे. म्हणजे चांगली गोष्ट जरी सांगायची इच्छा झाली तरी यांची हिमंत होत नाही.मात्र गावात काही स्पष्ट बोलणारीही मंडळी आहे आणि असाच एक चांगला विषय-विचार लोकांनी जनमत-पर्यंत मांडला. म्हणून सरत्या वर्षाच्या शेवटी का असेना, जनमत गावातील सर्वात स्वस्त जनतेच्या समस्या व त्यावरील तात्काळ निराकरण करण्यासाठीचे एक प्लेटफार्म असुन नेहमी कटीबद्ध असल्याची जाणीव लोकांनी करून दिली.

आज गावात चौकाचौकात अनेक थोर-महान-युग पुरूषांचे स्मारके आली.मग ते व्ययक्तीक खर्चातुन म्हणा या जनतेच्या पैशातुन म्हणजे शासकीय निधीतुन म्हणा.पण गावाच्या विकासात भर पडला आहे. मात्र ही स्मारके आल्यावर गावात जेवढा हर्ष-उल्हास आहे. तेवढी चिंताही व्यक्त केली जात आहे. कारण गावात मार्केट गेटसमोर गाय-वासरू स्मारक व स्टेट बँकेसमोरील रूपया स्मारक हे एकदम साध्या पद्धतीने व कमी उंचीवर उभारण्यात आले आहेत. कारण गाय मातेमध्ये पस्तीस करोड देवी देवतांचे दर्शन-स्थान आहे, असे आपले पुर्वज पहिल्यापासुन सांगत आले आहेत. तसेत देशातील जनतेला सकाळचा जो चहा मिळतो.त्यासाठी जे दुध लागते.ते ह्या गो-मातेपासुन मिळत असते. म्हणून जो नाही तो ह्या चौकातुन गेला तर गाय-वासरूच्या स्मारकाला स्पर्श करून-नतमस्तक होऊन पुढे जात असतो. तशीच परिस्थिती स्टेट बँक समोरील रूपया चौक-स्मारकाची आहे. अतिशय कमी उंचीत उभारणी करण्यात आली आहे. अर्थात रूपया-दौलत-पैसा याचे महत्त्व कोणाच्या आयुष्यात नाही, असा जगातील एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. कारण आज जगातील प्रत्येक माणूस दौलत कमविण्यासाठी घरातुन बाहेर पडत असतो.त्यात त्याच्या समाधाना इतकी दौलत संध्याकाळ पर्यंत खिशात पडली नाही तर व्यथीत असतो व पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच दौलत कमविण्यासाठी घराबाहेर पडतो.म्हणून हेच तर कारण आहे की,गावातील ही दोनच स्मारके कमी उंचीवर व एकदम साध्या पद्धतीने उभारण्यात आली आहेत. तर दुसरीकडे जी पण काही स्मारके आहेत. ती खुप उंचीवर आजुबाजूला संरक्षण कठडे, खाली उजेडसाठी लाईटे लावण्यात आली आहेत व त्यापैकी फक्त एका स्मारकासाठी दिवसरात्र निघराणी राहील यासाठी सिक्युरिटी गार्ड तैनात करत सी.सी.टी.व्ही.कँमेरे लावण्यात आले आहेत. जर सुरक्षा व काळजीचा प्रश्न उद्भवत असेल तर गावातील सर्वच स्मारकांना सिक्युरिटी गार्ड व सी.सी.टी.व्ही.लावणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक स्मारकांसाठी आजुबाजूला राहणारी व्यक्तींची सुरक्षा समिती गठीत करायला हवी.पण जर सर्वच महान-थोर-युग पुरूष आहेत. तर सर्वाना सिक्युरिटी गार्ड नेमत,सी.सी.टी.व्ही निघराणी ठेवणे आवश्यक आहे. म्हणून एकाला न्याय व इतरांना दुजाभाव करता कामा नये.

आज रात्रीच्या वेळी गावातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की,परिवारासह पायी फिरताना ह्या थोर-महान-युग पुरूषांचे दर्शन घ्यावे. पण दिवसा चालत्या टु-व्हीलर व फोर-व्हीलर गाडीवरून महात्म्यांचे दर्शन होत नाही. म्हणून रात्रीच्या वेळी पायी फिरताना दर्शनाचा आनंद घेणे योग्य वाटते.पण थोर-महान-युग पुरूषांचे चेहरे ऐवढे वरती झाले आहेत की, त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा उजेड दिसत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर उजेड येईल असे मर्क्युरी लाईट प्रत्येक स्मारकांच्या वरती बसवणे गरजेचे आहे.

मात्र आता पालीकेत पुढाऱ्यांची सत्ता नाही. म्हणून प्रशासक बसले आहे. आता हे प्रशासक जनताभिमुख तक्रारींची किती दखल घेते हे वेळेच सांगेल.पण सर्व जनतेने जर विचार केला तर नुसते पुतळे बनून गावात चर्चा करण्यापेक्षा दोन-चार ओळींचे किंवा काँमन सह्यांची मोहीम जरी फिरवली.तरी स्मारकांची चिंता-सुरक्षा-काळजीचा विषय मार्गी लागेल. शेवटी जनमत ने आपल्यापर्यंत आलेली समस्या शासनदरबारी मांडली आहे. यावर बघू आता प्रशासन काय भुमिका घेते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे