रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाल्याने वाहतूकदार ऊस वाहतुकीसाठी धजावत नसल्याने शेतकऱ्यांच्या पक्व ऊस शेतातच,
शहादा : विशेष तालुका प्रतिनिधी
शहादा- शिरपुर व शहादा- दोंडाईचा रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाल्याने वाहतूकदार ऊस वाहतुकीसाठी धजावत नसल्याने शेतकऱ्यांच्या पक्व ऊस शेतातच उभा आहे.परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पक्व ऊस तोडणीसाठी कोणीही धजावत नसल्याने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजी जिल्हा परिषद सभापती तथा शेतकरी संघर्ष समितीचे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली
प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांना निवेदन देण्यात आले, अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्यमार्गावरील शहादा शिरपुर या मुख्य रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे . रस्त्यावर गुढघ्या एवढे खड्डे पडले आहेत . त्याचप्रमाणे सारंगखेडा दोंडाईचा रस्त्यावर ही मोठे मोठे खड्डे झाल्याने वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. दोन्ही रस्त्यांवर खड्यांची संख्या अगणिक आहे . दररोज मोठ – मोठे अपघात होत आहेत . या रस्त्यावर प्रवास केल्याने अनेक लोक जायबंदी झाले आहेत . सध्या ऊस तोडणीस प्रारंभ झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरिप हंगामात शेतकऱ्यांचे अल्प उत्पादन आले आहे . सध्या शेतात उभा असलेला ऊस तोडणीला आला आहे . मजुरवर्ग ही ग्रामिण भागात दाखल होत आहेत . परंतु ऊस वाहतुकदार रस्त्याची अवस्था पाहुन वाहतुकीस नकार देत आहेत. ऊसाने भरलेले वाहन रस्त्यावर चालविणे शक्य नसल्याचे सांगतात , परीणामी ऊसाची तोडणी वेळेवर न झाल्यास शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे . शेतकरी हिताचा विचार करून रस्त्यावरित खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व उद्भविणाऱ्या परिस्थितीय संबंधित विभाग जबाबदार राहिल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत मोतीलाल पाटील , जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे, तुषार गोसावी, अनिल आगळे, प्रविण चौधरी, वसंत चौधरी, गणेश शिंदे, संतोष वाल्हे,गणेश राजे पाटील, मनिष चौधरी,नईम मंसुरी आदींच्या सह्या आहेत.
या साठी शेतकरी संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून
अनेक दिवसांपासून या मुख्य रस्त्याची वाताहत झाली आहे.आजपर्यंत अनेक वाहनधारकांचे नुकसान झाले आहे तर या रस्त्यावरून प्रवास करतांना अनेक प्रवासी जायबंदी झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्ती बाबत कोणीही लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नसल्याने अखेर शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी पाऊल उचलले आहे. लवकरच रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको ही करण्यात येणार आहे.
” परिसरात शेकडो एकर ऊस उभा आहे. रस्त्याअभावी ऊस तोड लांबणीवर पडत असल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. आधीच खरिपातील पिकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास येत्या दोन दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सरकारला अभिजित पाटील यांच्या कडून देण्यात आला आहे.