महाराष्ट्र
बजाज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांचे निधन
पुणे (जितेंद्र कोळी) बजाज उद्योग समूहाचे चेअरमन राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज सेठ यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. तब्बल पाच दशके बजाज उद्योग समूहाचे नेतृत्व केले. त्यांनी आज पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील ८ ते १० दिवसांपासून उपचार सुरू होते.
राहुल बजाज चे भारतीय अब्जाधीश प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता , त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले. 1965 पासून त्यांनी बजाज समूहाचा कामकाजाचा पूर्ण तोल सांभाळला होता. बजाज आटो ला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.