घरगुती वातावरणात ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रपंत दंडवते यांचा वाढदिवस साजरा
धुळे (प्रतिनिधी) अ भा मराठी पत्रकार परिषदेचे माजी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रपंत दंडवते यांचा आज ७८ वा वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एसेमजी देशमुख, राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनीही दूरध्वनीहून शुभेच्छा दिल्या. धुळे शहरातील पत्रसृष्टीतील अनेक पत्रकारांनी घरी भेटून अभिष्ट चिंतीले, अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या. सायंकाळी घरगुती वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अरविंद अण्णा कपोले, अपर्णा कपोले वहिणी, युगांधरा दंडवते, प्रा डॉ. अमोल दंडवते, प्रिती दंडवते, स्तवन दंडवते यांचा समावेश होता. माझ्या एका विनोदाने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले, याचा सर्वांनीच आनंद घेतला. खूप दिवसांनी ते हासल्याचे दंडवते कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जाणवले. त्यांचा लहानसा नातू स्तवन येणाऱ्यांचे लेखनी भेट देऊन स्वागत करीत होता.