महाराष्ट्र
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे
नंदुरबार (प्रतिनिधी) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून या योजनेतंर्गत अनुदान घेवू इच्छिणाऱ्या मदरसांनी ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.