गुन्हेगारीजळगाव जिल्हा

म्हसावद येथे सराफ दुकानात धाडसी चोरी ; एक लाखा पेक्षा जास्त ऐवजावर मारला डल्ला

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसावद येथे स्वाती ज्वेलर्स या सराफ दुकानात अज्ञात चोरट्यानी धाडसी चोरी करत जवळपास एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ऐवजावर डल्ला मारला असून या प्रकरणी म्हसावद पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.

२३ रोजी रविवारी दुकान मालक नाना सोनार हे बाहेर गावी गेले असता दुकानात त्यांचा मुलगा मयूर, भाचा सतीश हे दोघे जण दुकान चालवत होते सायंकाळी नेहमी प्रमाणे त्यांनी दुकानातील आपला संपूर्ण ऐवज तिजोरीत ठेवून दुकान लॉक करून घरी निघाले. २४ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातील काही नागरिकांनी दुकानाचे शटर उघडे बघून नाना सोनार यांना याबाबत माहिती दिली त्यावरून दुकानात त्वरित धाव घेत आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले

दुकानात बाहेरून शटरच्या दोन्ही बाजूने लोखंडी चायनल गेट बसवले असून जवळपास १० ते १२ कुलुपांचे पट्ट्या तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला शटर जवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व सायरनच्या वायरी कापून घेत डीव्हीआर देखील लंपास केला असून चांदीच्या वस्तू तसेच ग्राहकांच्या सोनेच्या नथ, बाळी जोड, गल्ल्यातील रोकड असा एकूण एक लाखाच्या जवळपास ऐवज लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी नाना तुकाराम सोनार यांनी म्हसावद औट पोस्ट मध्ये तक्रार नोंदवली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे