भोकरबर्डी येथे विभागीय आयुक्तत श्री पांढरपट्टे यांची भेट – ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले उल्लेखनीय उपक्रमाची पाहणी.
दिनांक-३१ जुलै २०२२ प्रतिनिधि-पंकज मालवीय
धारणी:- धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथील ग्रामपंचायतला नवीन रुजू झालेले विभागीय आयुक्त मा . पांढरपट्टे यांनी भेट दिली असून या ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले उल्लेखनीय उपक्रमाची पाहणी केली . ग्रामपंचायत भोकरबर्डी येथील राबविण्यात येणारे उपक्रम व एक आदर्श गाव म्हणून पाहणी करिता अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त मा . श्री पांढरपट्टे साहेब यांनी ग्रामपंचायत कडून १०० % कर भरणाऱ्या कुटुंबा करिता राबविण्यात येणारे उपक्रम उदा . मोफत आठाचक्की , मोफत आर . ओ . चे पाणी , मोफत हवा मशीन , मोफत तारेचे कुंपन , सांड पाणी व घनकचरा व्यवस्थापण पाहणी केली तसेंच शाळा , अंगणवाडी यांची पाहणी केली . राबविण्यात येणारे उपक्रम तसेंच गावातील सुविधा पाहून मा आयुक्त साहेब यांनी गावाचे कौतुक केले . या वेळेस धारणी चे तहसीलदार मा . शेवाले साहेब , पं . स.चे गटविकास अधिकारी मा . पाटील साहेब , जि . पं . बांधकामचे उपभियंता मा . ठाकरे साहेब , महिला व बाल कल्याण अधिकारी मा . चव्हान साहेब , मंडळ अधिकारी मा . श्री कुंभारे साहेब उपस्थित होते . तसेंच मा . जि.पं सदस्य श्री श्रीपाल साहेब , ग्रामपंचायत भोकरबर्डी चे उपसरपंच श्री रोहित पाल , ग्रामपंचायत चे सदस्य श्री बंडू साखरे , श्री श्रीराम कासदेकर सौ प्रीती मावस्कर , आडा पटेल श्री हरी जांबेकर , सचिव श्री विवेक राठोड , तलाठी कु . व्हेराठे , ता . सहाय्यक कु .सावंत व गावकरी उपस्थित होते.