शिंदखेडा येथील बी.के.नगरचे कै.विनायक पाटलांच्या प्रथम स्मरणार्थ मोफत विमा काढण्याचा कार्यक्रम ; ३७ ग्राहकांनी घेतला लाभ
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील बी.के.नगर मधील रहिवासी असलेले एस.टी.डेपोत चालक म्हणून सेवानिवृत्त कै.विनायक तोताराम पाटील यांच्या प्रथम स्मरणार्थ काॅलनी परिसरातील नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने दोन लाखापर्यंत चा विमा काढण्याचा गोरगरीब व गरजुसाठी मोफत विमा योजनेचा लाभ ३७ ग्राहकांनी घेतला.
यावेळी बँकेचे शाखाधिकारी अमीत गुप्तो, बादल वाघ, अजय पानपाटील, मनोज तलवारे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिपकदादा देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण पाटील, मिलिंद देसले, गोपी पवार, रहीम खाटिक, चेतन देसले, महेश सोनवणे, मिहीर पवार, निलेश वाणी, अतुल पवार आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले होते. सदर योजनेसाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफचे अजय पानपाटील यांचे सहकार्य लाभले.