हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
चोपडा (विश्वास वाडे) शिवसेनेचे शिलेदार व लढवय्या हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुतात्मा वीर कन्हैया बंधु प्रतिष्ठानतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शिवसेनेचे माजी आ.कैलास पाटील, मधुभाऊ कन्हैया याच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल मापाडी १०० कामगार बंधूंना हुतात्मा कन्हैया बंधू स्मृतीनिमित्त टी शर्ट वाटण्यात आले चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आली.तसेच वेले येथील अनाथालय व बालकाश्रमात गरीब मुलांना व वृद्धांना मिष्टान्नसह भोजन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हाप्रमुख दिपक जोहरी, माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक महेंद्र धनगर, शेतकी संघ संचालक प्रल्हाद पाटील, वेळोदा माजी सरपंच तथा तापी सूतगिरणी संचालक रमाकांत बोरसे, तुकाराम पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतभाई सचदेव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम परदेशी, बबलू पालीवाल, सुनिल भाऊ बडगुजर, सुभाष शिंपी, शशी कन्हैया, श्रीराम गायकवाड, पंकज चौधरी, विकास कन्हैया, गणेश कन्हैया, महेंद्र कन्हैया ज्ञानेश्वर पाटील, दर्शन कन्हैया, मनोज महाजन, विलास सुर्यवंशी, रणजित देशमुख, जितेंद्र पाटील, महेंद्र भोई, प्रेम घोगरे, अमोल भाट, तन्मय शिंपी, अजय जैन, यासह हुतात्मा वीर कन्हैया बंधू प्रतिष्ठानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.