महाराष्ट्र
श्रीराम नवमी निमित्ताने गोळवाडी ते शिर्डी पाई दिंडी रवाना
वैजापूर : दरवर्षीप्रमाणे श्री राम नवमी निमित्ताने गोळवाडी ते शिर्डी पाई दिंडी गोळवाडी येथून रवाना झाली आहे.
शिर्डी हे एक जगातील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धा म्हणजे आपण टाकलेला विश्वास असे भक्तांचे म्हणणे आहे. कर्ता आणि करविता शिर्डी साईबाबा आहे म्हणून भक्तांना उत्साह येऊन रोज बिना पादुकाचे तीस ते पस्तीस किलोमीटर खांद्यावरती साईंची पालखी घेऊन भक्त आनंदाने शिर्डीला जातात भाविक भक्तांचे म्हणणे आहे की श्री राम नवमी उत्साह निमित्ताने शिर्डी साईबाबा शिर्डी मध्ये वास करतात असे भक्त बोलतात. शिर्डी हे जगातील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान मानले जाते.