महाराष्ट्र
सोयगाव- शेंदुर्णी रस्ता दुरुस्ती करा, अन्यथा राष्ट्रवादीचे सोयगाव शहराध्यक्ष रवींद्र काळे तीव्र आंदोलन छेडणार
सोयगाव : शेंदुर्णी रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांना जा ऐ करतांना फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून प्रवाशांना नाविलाजाने प्रवास करावा लागतो. शेंदुर्णी जामनेर तालुक्यातील गाव असून तेथे बाजार पेठ,भगवान श्री त्रिविक्रम मंदिर आहे, सोयगावकर हे किराणा सामानापासून ते कपडा येथे खरेदी करतात शेंदुर्णी हे प्रतिपंढरीनगरी म्हणून सर्वश्रूत असल्याने एकादशीला सोयगाव शहरातील भाविक दर्शनासाठी जात असतात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नसल्याने वाहनचालकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे तरी सोयगाव – शेंदुर्णी रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोयगाव शहराध्यक्ष रवींद्र काळे हे तिव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.




