स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रथम पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम संपन्न
देगलूर (मारोती हनेगावे) काल स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांच्या अंतापुर या गावी करण्यात आला. यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला व आज मतदार संघातील सर्व जनतेसाठी रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर तज्ञ डॉक्टरांच्या तपासणीने सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ.जितेश अंतापुरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महापौर ताई, कवडे गुरुजी, किशोर स्वामी, बालाजी पांडागळे, बळेगावकर देशाई, प्रितम देशमुख हनेगावकर, शंकर कंतेवार, बसवराज पा.वन्नाळिकर,जनार्दन बिरादार, इतर कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण यांनी बिलोली मतदार संघाचे स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.