शिंदखेडा तालुक्यात नरडाणा महामार्गावर शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्याचा निषेधार्थ रास्ता रोको
शिंदखेडा (यादवराव सावंत) देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानी सूडबूद्धीने व राजकीय आकसातून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामागील सूत्रधार असलेल्या समाजकंटकांच्या निषेधार्थ आज नरडाणा येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे, माजी मंत्री हेमंत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य तथा माजी तालुकाध्यक्ष ललित वारुळे, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे यांच्या सहकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदखेडा तालुक्याच्या वतीने रास्ता रोको करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, शिवसेनेचे भाईदास पाटील, हिरालाल बोरसे, संतोष महाजन, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, माजी नगरसेवक राकेश पाटील, सतीश बेहरे, कपिल पाटील, बाळु सिसोदे, महेंद्र सिसोदे, डॉ. शांताराम पाटील, जगदीश ठाकरे, पंकज सोनवणे, फिरोज पटेल, मनोज मोरे, राजेंद्र पाटील, गटलु पाटील, आनंदा पाटील, अजय भामरे, अमृत भामरे, उमेश वाडीले, प्रमोद सिसोदे, पंकज कदम, किशोर पवार, संजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.