चोपडा येथे भजन गाऊन एस.टी. कर्मचाऱ्यांनी केला सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
चोपडा (जि. जळगाव) : विश्वास वाढे ता.विशेष प्रतिनिधी
एस.टी.कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे.या मागणीसाठी कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपात सहभागी झाले असल्याने,चोपडा आगारातील संपूर्ण बसेस बंद आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असून,ग्रामीण भागातील ज्या प्रवाशांना वैद्यकीय कामासाठी बाहेर गावी जायाचे आहे. त्या नागरिकाना बस नसल्याने घरी परत जावे लागत आहे यामुळे प्रवाशांच्या मोठ्याप्रमाणात हाल होत असून सरकार काय भूमिका घेते या कडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे.
एस.टी. कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे चोपडा आगारातून बस सेवा ठप्प झाली असलेने प्रवासी खाजगी वाहनाने प्रवास करीत आहे,पण यात प्रवाशांच्या जीवितेची हमी कोण घेणार हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. दिवाळी संपल्याने आपल्या आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासी प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनांत गर्दी करताना दिसत आहे मात्र ज्या प्रवाशांचे अर्ध टिकीट आहे त्यांना पूर्ण तिकीट देऊन खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. खाजगी टॅक्सीचालक एसटी भाड्यात प्रवाशांना सेवा देत आहे असे टॅक्सी चालक यांनी सांगितले.मात्र ज्यादा पैसे टॅक्सी चालक घेत आहे असेही काही प्रवाशी बोलत आहे.
चोपडयातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा पाठींबा सँपास पाठिंबा
एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलनीकरण करण्यात यावे व शासनाच्या सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना मिळाव्यात या मूळ मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे त्या संपाला चोपड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे , तालुका अध्यक्ष ऍड धर्मेंद्र सोनार, शहराध्यक्ष पुंडलिक महाजन, निलेश बारी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.