सायकल मार्ट ते केशरानंद उद्योग समूह : ज्ञानेश्वर भामरे यांचा यशस्वी प्रवास
दाऊळ (प्रतिनिधी) ४१ वर्षापूर्वी म्हणजे ७ डिसेंबर १९८० रोजी दावूळ या लहानशा गावातसायकलीचे दुकान टाकून व्यवसायाला सुरुवात केली. दुकानाचे नाव क्रांती ठेवले होते ते वडीलांनी सुचवले होते आणि म्हणून मी पुढे आईवडिलांच्याच नावाने उद्योग सुरू करायचे ठरवले आणि आजचा केशरानंद उद्योग समूहाची मुहूर्तमेढ ही क्रांती सायकल मार्ट पासून झालेली आहे.
गेल्या ४१ वर्षांमध्ये मागे वळून बघितलं तर आठवतय की ७ डिसेंबर १९८० रोजी मी सकाळी पाच वाजता गावातल्या एका दोनशे फूट जागेवर शेण व पाणी मिस्त्रीत करून जागेला सरा टाकला होता. वडीलांनी स्वतः सायकलीचा बोर्ड २ x १ चा तयार करून दिला होता. ४५० रुचे तीन सायकली मी आणल्या होत्या १५ ० रु रोख दिले होते ३०० रु तिन महीन्यांनी परत करणार असे सांगीतले होते. परंतु मी ते तीनशे रुपये फक्त दीड महिन्यातच परत केले आणि तेव्हापासून या क्षणापर्यंत कोणतेही कर्ज असो बँकेचे अथवा खाजगी सावकारीचे ते मी वेळेवरच परत केलेले आहे.
लोक काय म्हणतात याकडे मी बघत नाही मी काय करायला हवं याकडे मी बघत असतो आणि म्हणून सकाळी पाच ते रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मी आजही काम करत असतो अनेक व्यवसाय केले. परंतु, वडिलांनी शिकवलेल्या नीतीचा मार्ग कधीच सोडला नाही. केशरानंदहे आई वडिलांचे नाव आहे. याला धब्बा लागेल असं कोणतेही काम मी केलं नाही करणार नाही आणि म्हणून मला विधानसभेची २००४ ची निवडणुक वगळता समाजकारण राजकारण किंवा व्यवसाय कुठेही अपयश आले नाही व्यवसाय करत असताना व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक राहतो. तसंचसामाजिक काम करत असताना सुद्धा कोणाकडूनही चहाची सुद्धा अपेक्षा ठेवत नाही. स्वतःच्या व्यवसायातून आपण लोकांचे काही देणे लागतो या भावनेतून अनेक समाजोपयोगी काम नेहमी करत असतो काम करत असताना अनेक चढ-उतार आले परंतु आई-वडिलांचे आशीर्वाद अनेक आपल्यासारखे चांगल्या लोकांचे सदिच्छा सोबत असल्याने त्यातून सर्व मार्ग निघत गेले .
राजकारणात दाऊळ गावाच्या सरपंचापासून च्यार वेगवेगळ्या मतदार संघातून जिल्हा परीषदेमध्ये सदस्य म्हणून लोकांनी निवडून दिले. ज्या जिल्हा परीषदेत माझे वडील शिक्षक होते त्या जिल्हा परीषदेतमध्ये उपाध्यक्ष व शिक्षण सभापती होण्याचा माण मला जनतेने मिळवून दिला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो लोकांच्या आर्शीवादानेच हे शक्य झाले आहे. आज ही मला समाज उपयोगी काम करत असताना असे कधी जाणवत नाही की आपण लोकांवर काही उपकार करत आहोत उलट मला असं वाटतं की परमेश्वराने आपल्याला इतर लोकांपेक्षा चांगले ठेवले. असल्यामुळे आपण नेहमी लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे आणि म्हणून मी हे करत असतो.
त्यातच मला समाधान वाटतं म्हणूनच मला व माझ्या पूर्ण कुटुंबाला कोरोना झाला असताना मला स्वतःचा स्कोर पंचवीस असतानासुद्धा पहिल्या लाटेमध्ये दिनांक ३० जुलै २०२० कोरोणाच्या महाभयंकर लाटेतून मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जीवदान मिळाले आणि म्हणून त्या दिवसापासून पुनश्च माझं उर्वरित आयुष्य हे लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे यासाठी समाजकारणावर जास्तीत जास्त भर देण्याचा माझा माणस आहे. आजही मी झोपताना सायकल कडे व आई-वडिलांच्या प्रतिमेकडे बघून झोपतो उठताना सुद्धा सायकल कडे बघूनच उठतो व आई-वडिलांना स्मरण करून दिवसाची सुरुवात करतो. दाऊळ गावात राहिलो गावाची अनेक वर्ष सेवा केलीआता दोंडाईचा शहरामध्ये वास्तव्याला आहे आणि म्हणून दोंडाईचा शहरातील माझे स्नेह संबंधातील आशिर्वाद देणाऱ्या जेष्ठांच्या व मित्र परिवाराच्या बळावर दोंडाईचा शहरामध्ये वेगळं करून दाखवण्यासाठी पुढचं आयुष्य मला खर्ची करायचे आहे.
१९८९ साली दोंडाईच्या शहरात माझा हिरा चा कारखाना होता आणि जमीनींचा व्यवसाय सुद्धा दोंडाईचा शहरात आहे. सर्व व्यवसायांमध्ये मला दोंडाईच्या शहराने यश प्राप्त करून दिलेले आहे आणि म्हणून ह्या शहराचे देखील आपण काही देणं लागतो या भावनेने दोंडाईचा शहरात वास्तव्याला आलो आहे. हिरे कारखाना होता तेव्हापासून आजपर्यंत दाऊळ गावात झोपण्याच्या व्यतिरिक्त मी दोंडाईच्यातच राहिलेला आहे. अनेक मित्र परिवारांचा व्यवसायानिमित्त व राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे संबंध आहेत. हे सर्व संबंधांना सोबत घेऊन दोंडाईचा शहराला पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील आपल्या आशीर्वाद आणि सदिच्छा पाठीशी असू द्याव्यात आपला सर्वांचा सन्मित्र ज्ञानेश्वर भामरे.



