महाराष्ट्र
नानासाहेब रहाटे यांची शिवसेना तालुका उपप्रमुखपदी निवड
सिल्लोड (विवेक महाजन) हट्टी ता. सिल्लोड येथील शिवसेना कार्यकर्ते नानासाहेब आनंदा रहाटे यांची शिवसेना सिल्लोड तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते तसेच शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटे यांना उपतालुका प्रमुख निवडी बाबत पत्र देण्यात आले.
यावेळी कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, नामदेव उबाळे, नगरसेवक मनोज झंवर, राजुमिया देशमुख, हनिफ मुलतानी, कायगावचे उपसरपंच विश्वास दाभाडे, कल्याण डवणे, हट्टी येथील त्र्यम्बक जरारे, जनार्धन जरारे, नामदेव रहाटे, श्रावण रहाटे आदींची उपस्थिती होती.