चो.सा.का.कडुन थाकीत पेमेंटचे उस उत्पादकांना चेक वाटप
चोपडा (विश्वास वाडे) २०१४-१५ च्या हंगामाचे ६०१ रुपये प्रमाणे १९६३ शेतकऱ्यांचे ७ कोटी ६४ लाख रुपये कारखान्याकडे बाकी होते. सर्वपक्षीय नेते कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी शेतकरी कृती समिती यांच्यात वेळोवेळी चर्चा घडून आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यात आला. १५ मार्च पर्यंत एफआरपी नील होईल. १५० रुपये डीपॉझिट ठेवणार असून ते पुढील वर्षी एप्रिल मध्ये अदा होणार असल्याचे यावेळी चेअरमन अतुल ठाकरे यांनी सांगितले.
माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, माजी कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन प्रवीण गुजराथी, संचालक आत्माराम म्हाळके, प्रदीप पाटील, सुनील महाजन, भरत पाटील, निलेश पाटील यांच्यासह माजी पं स सभापती ॲड. डी. पी. पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट शेखर पाटील, राजेंद्र पाटील, नेमीचंद जैन, अनिल साठे
दोधू काळू पाटील (वडगाव), ज्ञानेश्वर संतोष पाटील (भवाळे), संदीप विलास पाटील (चहार्डी), अनिल प्रताप पाटील, रामसिंग अमृत पाटील, सुरेश वना पाटील, प्रकाश वना पाटील, नरेंद्र रामकृष्ण पाटील (सर्व आडगाव) या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप करण्यात आले.