जनतानगर, माळीवाडा, सावतानगर येथे शिवसेनेचे गणेश परदेशी यांच्या प्रयत्नातून २०० महिलांना गॅसचे वाटप
शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाने उज्ज्वला गॅस योजनेचा महिलांना मिळाला लाभ
शिंदखेडा (प्रतिनिधी) येथील जनता नगर, माळीवाडा, सावतानगर परिसरात शिवसेना-युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परेदशी यांच्या प्रयत्नातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब हेमंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाने उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून २०० महिलांना गॅस सिलेंडर व शेगडी तसेच अन्य साहित्याचे वाटप जिल्हाप्रमुख साळुंके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला-नागरीकांनी गर्दी केली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रमुख हिरालाल बोरसे, शहर उपविभागप्रमुख किशोर पाटील, विभागप्रमुख मनोज पवार, उपतालुकाप्रमुख अमोल राजपुत, किरण राजपुत, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, उपशहरप्रमुख कुणाल माळी, दिनेश परदेशी, वाहतुक सेनेचे नाना पहाडी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके म्हणाले की, माय-माऊलांच्या अश्रू पुसण्याचे काम खऱ्या अर्थाने गणेश परदेशी यांनी केले आहे. संजय गांधी निराधार योजना असो, रेशन कार्ड बनविणे असो, किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहचविणे असो, शिवसेनेच्या माध्यमातून गणेशचे काही ना काही तरी काम हे सुरुच असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारणाचे काम गणेश परदेशीकडे पाहिल्यावर दिसून येते, असेही साळुंके यांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर माळी, भुषण परदेशी, रामजी माळी, शाम गिरासे, राहुल माळी, राम गिरासे, निलेश परदेशी आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.