राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत घोडगाव विद्यालयाचे नेत्रदीपक यश
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी.निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय निबंध, चित्रकला, घोषवाक्य या स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले. चित्रकला स्पर्धेत विद्या कांतीलाल करनकाळे (इ.११वी) या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविला तसेच तिचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड झाली.
तालुकास्तरावर निबंध स्पर्धेत नेहा बन्सीलाल पारधी (इ.११ वी) प्रथम क्रमांक मिळविला तर घोषवाक्य स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक जयश्री विलास साळुंखे (इ.१० वी) या विद्यार्थीनींनी पटकाविला. या गुणवंतांचा सत्कार माननीय अनिल गावित (तहसीलदार, चोपडा) यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. नवमतदारांमध्ये निवडणुकीविषयी जाणीव- जागृती निर्माण व्हावी व लोकशाही प्रक्रिया बळकट व्हावी यासाठी विद्यालयात स्थापन झालेल्या निवडणूक साक्षरता मंचाच्या माध्यमातून विद्यालयात स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. स्पर्धकांना मंचाचे नोडल अधिकारी प्रा. समाधान बिऱ्हाडे, सतिष आर. पाटील, कलाशिक्षक वसंत ए. नागपुरे, प्रा.ईश्वर राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रवीलाल पाटील,सचिव जवरीलाल जैन व संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर.पी. चौधरी, पर्यवेक्षक व्ही.ए. नागपुरे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.