भाजपच्या बड्या नेत्यांबद्दल ईडीला लवकर पुरावे देणार : अनिल गोटे
धुळे (विक्की आहिरे) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. या कारवाईचा निषेध केंद्रातील करण्यासह भाजप सरकारकडून सरकारी यंत्रणेचा होणारा गैरवापर, दडपशाही विरोधात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन झाले. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली. भाजपच्या बड्या नेत्यांच्या विरोधात लवकरच ईडीला पुरावे देणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष प्रा. शरद पाटील, रमेश श्रीखंडे, गणेश गर्दे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, प्रमोद सिसोदे, अशोक सुडके, मुजफ्फर हुसेन, चितोडकर, प्रमोद सांळुखे, प्रशांत भदाणे, कैलास चौधरी, अविनाश लोकरे, कुणाल पवार, एन. सी. पाटील, साबीर शेख, महेश घुगे, शकील अन्सारी, विजय वाघ, संजय बगदे, प्रशंत भदाणे, किरण नगराळे, वामन मोहिते, किरण बागूल, राजू चौधरी, राजेंद्र कमलेश देवरे, वामन मोहिते, जमिर शेख, शकिल अन्सारी, किरण बागूल, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बानूबाई शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सरोज कदम, हिमानी वाघ, जया साळुंखे, शोभा आखाडे, छाया सोमवंशी, नाजनीन शेख आदी सहभागी झाले. भाजप व त्यांच्या नेत्याविषयी मंत्री नवाब मलिक बोलत असल्याने व भाजप राज्यात सत्तेत नसल्याने सुडबुध्दीने आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते आहे. केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत आहे. हा प्रकार अघोषित आणीबाणी सारखा असल्याचा आरोप करण्यात आला.