शासकीय काम करत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिविगाळ ; इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) भुसावळ शहरातील गरुड प्लाॅट येथील रहिवासी याचे राहते घर अतिक्रमण असल्याचे व त्यास नोटीस बजावून ही त्याने राहते घराचे अतिक्रमण काढलेले नसल्याने सदर अतिक्रमण नगरपालिकाच्या वतीने काढण्यास आले. अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ करुन त्यांच अंगावर धावून शासकीय कामात अडथडा निर्माण करणाऱ्या इसमाविरुद्ध शहरपोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, दि.२४ रोजी शहरातील गरुडप्लाट येथील रहिवासी राजू बाबूलाल चंदन यांचे राहते घर अतिक्रमण असुन पलिका ने त्यांना अतिक्रमण काढण्यास पूर्व सूचना देऊन ही त्यांनी अतिक्रमण काढले नसल्याने नगरपालिका अतिक्रमण काढण्यची मोहिम अंतर्गत शासकीय काम करत सदर अतिक्रमण काढण्यास नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार सह नगरपालिका कर्मचारी पोहोचले असता राजु बाबूलाल चंदन यांनी जोरजोरात आरडाओड व शिविगाळ करत बलपूर्वक मुख्याधिकारी व पालिकाकर्मचारींवर धावून आला. आणि शासकीय कामात अडथडा निर्माण केला म्हणून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व विजय तोष्णीवार कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग यांनी दिलेलल्या तोंडी तक्रारावर राजु बाबूलाल चंदन या इसमाविरुद्ध शहर पोलिस स्थानकात गु.र.न.००३६/२०२२भा.दं.वि.३५३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.नि. गजानन पडघन हे करीत आहे.



