महाराष्ट्र
सोयगाव येथे सविता चौधरी यांचा सेवानिवृत्ती सत्कार
सोयगाव : सेवापूर्ती समारोह’ आज 31 मे 2022 रोजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे सविता सुभाष चौधरी यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अजिंठा शिक्षण संस्थेचे संचालक श्री सुभाष चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार डॉ. रावसाहेब बारोटे व स्टॉप वेल्फेअर समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीनारायण कुरपटवार तसेच कार्यालयीन अधीक्षक पंकज साबळे या सर्वांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शंतनु चव्हाण तर आभार डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता सर्व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.