चोपडा

महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील यांना श्रद्धांजली ; आठवणींना दिला उजाळा !

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी सर्वपक्षिय नेत्यांनी,साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक,वैद्यकीय, कला क्षेत्रातील यासह इतर राजकीय मान्यवरांनी कोरोनाचे नियम पाळत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्याच्या स्मृतींना उजाळा ही देण्यात आला.

आज दि ५ रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड संदीप पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुनभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, संस्थेच्या सचिव डॉ स्मिता पाटील, डॉ शुभांगी पाटील, सुषमा पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड घनश्याम पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, उपाध्यक्षा आशाताई पाटील, माजी उपप्राचार्य प्रा डी बी देशमुख आदींनी पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी हातेड आश्रम शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, डॉ विकास हरताळकर, डॉ विजय पोतदार, ऍड रवींद्र जैन, शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, चोसाका संचालक प्रवीण गुजराती, मनीष पारीख, नगरसेविका सुप्रिया सनेर प्रा कांतीलाल सनेर, जी प सदस्या डॉ प्रा नीलम पाटील, शेतकी संघ माजी अध्यक्ष शेखर पाटील, चहार्डी येथील प्रकाश पाटील, सुधाकर पाटील अशोक पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, महेंद्र बोरसे, गोविंदा महाजन, अमृत वाघ,मधुकर बाविस्कर, जगन्नाथ पाटील, माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, नगरसेवक अशोक बाविस्कर, डॉ अशोक कदम, डॉ महेंद्र जैस्वाल, डॉ विनीत हरताळकर, नगरसेवक डॉ रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे डी बी पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशिकांत देवरे, बाजार समिती संचालक रवींद्र पाटील, चोसाका संचालक निलेश पाटील, सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, श्रीकांत नेवे, देवेंद्र पाटील, हातेड
माजी उपसरपंच मनोज सनेर, माजी उपसरपंच विनोद पाटील, प्राथमीक शिक्षक संघटनेचे योगेश सनेर, नगरसेवक किशोर चौधरी, राजू बिटवा, उल्हास पाटील, नितीन सोनवणे, संजीव बाविस्कर, दीपक पाटील, सुतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, पं स माजी सभापती डी पी पाटील, चोसाका संचालक गोपाल धनगर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, अजबराब पाटील, शहराध्यक्ष के डी चौधरी, रमेश भोईटे, विकास शिर्के, डॉ पराग पाटील, बी एम पाटील, महेश शर्मा, मंगेश भोईटे, ग स संचालक देवेंद्र पाटील, नंदकिशोर सांगोरे, प्रमोद पाटील, अनिल कदम, आर डी पाटील, सतिश बोरसे,पं स माजी सभापती प्रमोद पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, तुकाराम बाविस्कर, संजीव बाविस्कर यांच्यासह असंख्य मान्यवरांनी स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सर्व विभागातील प्रमुख व प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. स्मृतिस्थळाची सजावट कलाशिक्षक दिनेश बाविस्कर यांनी केली. प्राचार्य डॉ डी ए सूर्यवंशी, मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे, एच बी मोरे,एल एच अहिरे, प्रा संदीप पाटील, डॉ प्रा शैलेश वाघ, अशोक साळुंखे, दिलीप साळुंखे, प्राचार्य गौतम वडनेरे यांच्यासह इतर विभागातील प्रमुखांनी परिश्रम घेतले.

कस्तुरबा विद्यालय शरदचंद्रिका पतपेढी अभिवादन

शहरातील शरदचंद्रिका पतपेढीत पतसंस्था अध्यक्ष प्रा डी बी देशमुख, डॉ स्मिता पाटील, ऍड संदीप पाटील, ऍड व्ही डी जोशी, सराफ नेमीचंद जैन, व्यवस्थापक जयवंत पाटील यांनी तर अ मु साळुंखे प्राथमिक विद्यालय व कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात समन्वयक आर डी साठे, मुख्याध्यापक एच बी मोरे, एल एच अहिरे, यांनी माल्यार्पण करीत अभिवादन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे