महाराष्ट्रराजकीय
शिंदखेडा येथे उत्तरप्रदेश निकालाचा तालुका भाजपच्या वतीने पेढे भरवुन आनंद साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भाजपच्या तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते वतीने जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेश मधील भाजपाला स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असताना स्पष्ट बहुमत मिळाले हे सिद्ध झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पेढे भरवुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, तालुकाध्यक्ष प्रा.आर.जी.खैरणार, नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश नागो देसले, शहराध्यक्ष प्रविण माळी, रेल्वे प्रवासी आघाडीचे अध्यक्ष दादा मराठे, नगरसेवक किसन सकट, अॅड.विनोद पाटील, राजेंद्र बोरसे, गणेश खलाणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.