शिंदखेडा येथील तहसीलदारांना निवेदन ; वसतीगृहाचा प्रवेश रद्द केला म्हणून विद्यार्थी कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील संत गुलाब महाराज अनुसूचित जमाती मुलांचे वस्तीगृह येथे विद्यार्थी अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी हे दोघे विद्यार्थी सन 2018/19 या वर्षापासून अॅडमिशन होते पण गेल्या 2 वर्षापासून आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळेकडून अनुसूचित जमातीचे हे दोघं विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे योग्य व संविधानिक कारण न देता वस्तीगृहतून प्रवेश रद्द केला हा अन्याय आदिवासी विद्यार्थ्यांवरती गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि शिक्षण घेण्यासाठी अन्याय केला जात आहे म्हणून हे दोन्ही विद्यार्थी आणि त्यांची आई सौ. सरलाबाई दिलीप कोळी आमरण उपोषणास बसणार आहेत. त्या संदर्भात तहसीलदार सुनील सैदाणे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनाद्वारे संबंधित प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून त्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा आणि मागील दोन वर्षाची डी.बी.डी. त्वरित द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांपासून कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित ठेवता येणार नाही आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे हे या विद्यार्थ्यांवर हेतुपुरस्कर द्वेष भावनेने या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांवर गेल्या दोन वर्षापासून शिक्षण घेण्यास अन्याय करीत आहेत या सर्व बाबींची पाठपुरावा वेळोवेळी आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे देण्यात आलेली असून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत होते अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर तात्काळ अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा असे आव्हान तर दि. 15 मार्च 2022 रोजी विद्यार्थी कुटुंबासह अनुसूचित जमातीच्या वस्तीगृहासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. या निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना मिलिंद रमेश पाटोळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन सिंदखेडा तालुकाध्यक्ष त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आई सरलाबाई दिलीप कोळी आणि दोघे विद्यार्थी उपस्थित होते.