महाराष्ट्र

जयश्रीबेन पटेल व राजेंद्र अग्रवाल यांचा नागरी सत्कार

शिरपूर (ॠषिकेश शिंपी) माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व सुप्रसिध्द व्यापारी तथा शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल यांची नगरपरीषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२ साठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाल्याबद्दल वरचे गाव येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे पांडू बापू माळी विद्यालयाच्या मैदानावर नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर, व्यंकटेश बालाजी संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, उपाध्यक्ष उत्तमराव माळी, कोषाध्यक्ष ईश्वरलाल शिरसाठ, सहचिटणीस शामकांत ईशी, विजयसिंग गिरासे, मर्चन्टस् बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, जिल्हा बँकेच्या संचालिका सीमा तुषार रंधे, माजी नगरसेविका संगीता देवरे, छाया ईशी, मुमताजबी कुरेशी, भुरा राजपूत, राजेंद्र पाटील, राजू शेख, रज्जाक कुरेशी, हर्षल राजपूत, चंद्रकांत सोनवणे, सोनु सोनार, संतोष माळी, पांडूरंग माळी, भूपेश अग्रवाल, दुर्गेश चौधरी, राजेंद्र चौधरी, विजय तिवारी, पांबामाचे मुख्याध्यापक के.पी. कुळकर्णी, ए.एस. कानडे, सुभाष गवळी, जितेंद्र जाधव, प्रेमसिंग राजपूत आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले की, आ. अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर शहराचे सौंदर्य कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. नोकरदारांनी सायकलीचा वापर करून प्रदूषण टाळण्यास सहकार्य करावे, नागरीकांनी कचरा रस्त्यावर न टाकता त्यासाठी घंटागाडीचा वापर करावा.

उत्तमराव माळी यांनी सांगितले की, प्लॅस्टीक बंदी असतांनाही सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे. प्रशासनाने प्लॅस्टीक बंदी सक्तीने करुन कापडी पिशव्या वापरण्यासाठी जनजागृती करावी. आरोग्य सहाय्यक दीपाली साळुंखे म्हणाल्या की, नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत शहरात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थितांना स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली.

जयश्रीबेन पटेल व राजेंद्र अग्रवाल यांनी सत्कार केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानून शहरात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. शामकांत ईशी यांनी प्रास्ताविकात स्वच्छ अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीमती पौर्णिमा पाठक यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे