महाराष्ट्र

बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क व जागृती बुद्ध विहार यांच्या माध्यमातून लासुरा बु येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

शेगाव (आनंद जवंजाळ) बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क व जागृती बुद्ध विहार यांच्या माध्यमातून लासुरा बु येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 146 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापुरुष जिवन संदेश अभियान अंतर्गत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या समकालीन महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वैचारिक नाते काय होते, समाज जनजागृती साठी त्यांनी कोणता संघर्ष केला या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाभाऊ पाटील यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुकर पाटील, अक्षय गव्हांदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची अध्यक्षता मधुकर गव्हांदे, प्रदेश अध्यक्ष बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क महाराष्ट्र यांनी केली तर सूत्रसंचालन अविनाश जवंजाळ यांनी केले व आभार प्रदर्शन संजय धुरंधर यांनी केले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये पत्रकार आनंद जवंजाळ, विठ्ठल पाटील, सदाभाऊ बोरसे, सीताराम जवंजाळ, सीताराम गव्हादे, श्रीकृष्ण पाटील इत्यादी बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती युवामंच च्या कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे