तलावातील पाण्याचा शेतकऱ्याला होणार फायदा ; आ. रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून अखेर यश
वैजापूर (अशोक पवार) कोल्ही मध्यम प्रकल्प 100% टक्के तलाव भरलेला असतानाही शेतकऱ्याला त्या पाण्याचा फायदा होत नव्हता. तलाव खाली गावातील शेतकरी कोल्ही सुदामवाडी बोरसर या शेतकऱ्याचे पिक सुकत होते. तोंडी आलेला पिक वाळुण चाले होते. शेतकऱ्यांनी आमदार रमेश बोरणारे यांच्याकडे वारंवार समस्या मांडून आज अखेर शेतकऱ्यांना आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून अखेर यश मिळाले.
न्याय मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. यावेळी शेतकरी सरपंच प्रभाकर सोनवणे, संजय पवार, राधाकिसन शेवाळे, वाल्मीक पवार, किसन पवार, रमेश जगधने, कारभारी पवार, अशोक जगधने, निलेश जगधने, बापु पवार, राजू सोनवणे, मधुकर शेवाळे, रमेश पवार, मधुकर शेवाळे, राजू पवार, भावलाल जगधने, नंदू जगधने, गणेश शेवाळे, बापू सोनवणे, दीपक पवार, कॅनल अधिकारी गायके, जाधव, विष्णू मगर, आप्पा मगर, गावातील शेतकरी, नागरिक उपस्थित होते.