महाराष्ट्र

वरकुटे येथील शेतकरी आंदोलनातील आरोपीची निर्दोष मुक्तता

मोहोळ (श्रीराम सोलंकर) संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव आदी बाबत दिनांक 15 जून 2017 रोजी पुकारलेल्या संपामध्ये मोहोळ तालुक्यातील वरकुटे या गावी मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी एसटी बसचे दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते व सरकारी कामात अडथळा आणला होता.

त्याबाबत मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि. कलम 353, 427,148, 149 ,504, 506 व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याची सुनावणी सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या समोर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बचुटे, गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील शिंदे, समाधान बचुटे, अमोल बचुटे, मोहन बसाटे, सोमनाथ बचुटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी आरोपीतर्फे अँड. सर्जेराव पडळकर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे