महाराष्ट्रराजकीय

आता समोरचे प्रचारकही गुंड दिसु लागले आहेत : शैलेश आजगे

साक्री (प्रतिनिधी) साक्री नगरपंचायतीच्या सत्ताधार्‍यांना सत्तेची एवढी नशा चढली आहे की, स्वतामध्येच गुंडप्रवृत्ती असल्याने व साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत परीवर्तनाचा वारू उधळतांना दिसत असल्य़ाने पायाखालची वाळु घसरत चालल्याने आता समोरचे प्रचारकही त्यांना गुंड दिसु लागले आहेत. असा घणाघाती प्रहार भाजापाचे जिल्हा सरचिटणिस व प्राभाग १३ चे उमेदवार शैलेश आजगे यांनी केला.

साक्री नगरपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग ११ च्या उमेदवार उज्वला विजय भोसले यांच्या प्रचारार्थ गढी भिलाटीत घेतलेल्या प्राचार सभेत बोलत होते. साक्री शहरात मागील सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेल्या विकासाबाबत बोलतांना म्हणाले की, यांनी एखादे तरी चांगले कार्य केलेले असेन तर सांगा…. यांच्याकडे फक्त आणि फक्त गरीब जनतेचे शोषण करणे आणि आपले खिसे भरणे एवढंच काम आहे. साक्री नगरपंचायतची मागील पाच वर्षे ज्या लोकांकडे सत्ता होती त्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, गोरगरिबांची लुटमार, कामाच्या नावाखाली पैसे बळकावणे, लालसा दाखवणे हेच काय, तर केंद्रात असलेल्या भाजपा सरकारने लागू केलेल्या योजना यांनी गरीब लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत, आणि आता २०२१ ला लागलेल्या साक्री नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी जर एखादा स्थानिक व्यक्ती सहभागी होत असेल तर त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत.

गेली ३०-३५ वर्षे यांनी या आपल्या साक्री शहराला काय दिले ? हे जर विचारले तर हे लोक तोंड लपवतात, आपल्या या साक्री शहराची आज शिरपूर सारखी अवस्था हवी होती त्याच साक्री शहरात विकासाच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्याचं काम या मागील सत्ताधारी लोकांनी केलं. या लोकांच्या हातातून सत्ता आणि त्यातून मिळणारा पैसा या निवडणूकीत जाताना दिसतोय म्हणून हे सगळे भारतीय जनता पार्टी चे नाव खराब करून लोकांची दिशाभूल करण्याचा डाव रचत आहेत. साक्री शहरातील भिल्ल समाजाला आजपर्यंत फक्त मतदार म्हणुन वापरून घेतले आहे. आजही गढीभिलातील महिला पाणी आणण्यासाठी नदीवर हंडा घेउन जात आहेत, तांच्या वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भिल्ल समाजाचा विकास तर केलाच नाही परंतू यांना या ना त्या कारणाने तुरुंगात टाकण्याचे काम या स्वताला विकासपुरूष म्हणणार्‍या महाभागाने केले आहे. महाराष्ट्रातील ही एकमेव अशी नगरपंचायत आहे की, संपुर्ण शहरात एकही सार्वजनिक मुतारी नाही. गटारींचा प्रश्न तर साक्रीकरांच्या ऎरणीवरच आहे. आजपर्यंत ज्याच्यातून बक्कळ पैसा मिळतॊ तेवढीच कामे केली आहेत ती म्हणजे रस्त्यांची. रस्तेही असे की फ़ेवर ब्लॉक वर डांबरीकरण, त्यांउळे रस्ते वर व घरे खाली अशी अवस्था कॉलन्यांमध्ये दिसुन येत आहे. शिवसेनेच्या नावाने निवड्णूक लढवित आहेत पण साक्री कर एवढे दुधखुळेही नाहीत कि, उमेदवार हे शिवसेनेचे आहेत का दावणीतले आहेत. खर्‍या शिवसेनेला एका जागेचा तुकडा फेकून गुरगुरणार्या वाघाला चुप केले आहे. आज पारवर्तन करण्याची नामी संधी साक्रीकरांना चालुन आली आहे. आणि या संधीचे नक्कीच सोने होईल व परीवर्तन घडेल, निवडुन येणार्‍या नगरसेवकांना खर्‍या अर्थाने लोकशाही काय असते ते कळेल, असंही ते म्हणाले.

यावेळी हेमंत पवार यांनी आपल्या भिलाऊ भाषेत मनोगत व्यक्त करीत आपल्या समाजाचा या सत्ताधार्‍यांनी फक्त वापरच केला असल्य़ाने आदिवासींना जागृत हॊण्याचे आवाहन केले. विजय भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रचार सभेस हर्षवर्धन दहीते, विलासराव बिरारीस, अ‍ॅड.गजेंद्र भोसले, बापू गीते, दिलीप काकुस्ते, उत्पल नांद्रे, त्र्यंबक भामरे, प्रभाकर बच्छाव, रमेश सरक, भाजपाचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, शशीकांत भामरे, सनी अकलाडे, रंगा भवरे, गणेश सुर्यवंशी, राहुल बागूल, गोपा पहेलवान, रामचंद्र सैंदाणे, महेश अहीरराव, शहराध्यक्ष कल्य़ाण भोसले, योगेश भामरे, राकेश दहिते, तसेच प्रभाग ११ च्या उमेदवार उज्वला विजय भोसले व गढी भिलातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे