भारतीय दलित महासंघाचे बांबवडे येथे लाक्षणिक उपोषण
शाहूवाडी (डी.एस. नांगरे) शित्तूर – वारुण (तालुका – शाहूवाडी) येथील बांबवडे येथे भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 1 मार्च 2022 रोजी करणार असल्याचे निवेदन तहसीलदार शाहूवाडी यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकाला शैक्षणिक व नोकरीविषयीक क्षेत्रात आरक्षण मिळावे आणि शासनाने आरक्षणा संदर्भात गांभीर्याने विचार करावा. या सौंविधानिक मागणीसाठी न्याय मागणीसाठी 1 मार्च रोजी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून शासन व प्रशासनाने यांची दखल घ्यावी.
निवेदनावर श्रीकांत कांबळे (प्रदेश अध्यक्ष भारतीय दलित महासंघ), आकाश कांबळे, सुरेश पाटील, पवन राऊत, महेश हळकुंडे, दयावान चौगुले, प्रदीप माने, पंकज घोलप, संजय बनसोडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.