खानापूर येथे अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करणार : प्रतिभा आटकळे
देगलूर (मारोती हनेगावे) खानापूर येथे माता रमाई यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा आटकळे बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी माता रमाई यांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांचे स्त्री शिक्षणाविषयीचे विचार आजच्या पिढीला कसे प्रेरणादायी आहे हे समजावून सांगितले यानिमित्ताने खानापूर सर्कलमधील सर्व महिलांना संघटित करून एक महिला कशा पद्धतीने कुटुंबाचा, समाजाचा, व राष्ट्राचा अभिमान जपु शकतात यावरून सर्व महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. अशाच पद्धतीने खानापूर सर्कल मधील चैनपुर येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त श्वेताताई बसवराज पाटील व प्रतिभा ताई अटकळे यांच्या नेतृत्वामध्ये एक वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. त्या प्रसंगी सर्व महिलांना स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून सर्व महिलांना देण्यात आले. यानिमित्ताने महिलांमध्ये स्वाभिमान जागे करण्याचा हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे अशी भावना सर्वसामान्य महिला बोलत आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अनुसयाबाई पाटील, ग्रा.प.सदस्या अर्चना ताई ताडकोले ग्रा.प.सदस्या, राजाबाई यनलवार, शिवनंदा परबते, र्श्रीदेवी कामशेट्टे, अस्मिता वाघमारे व इतर महिला याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अर्चना वाघमारे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांताबाई वाघमारे, कमलबाई वाघमारे, सविता वाघमारे, तक्षशिला वाघमारे,रेणुका वाघमारे, शांताबाई वाघमारे, आदींनी प्रयत्न केले. हा कार्यक्रम गावातील सन्माननीय सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रयत्नाने महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी केले. त्याबद्दल खानापूर सर्कलमधील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.