सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कामगार नेते जहागीर ए.खान यांचा नोकरी चा राजीनामा

जळगांव (प्रतिनिधी) सामाजिक हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने व शासन नियमाचे उल्लन्घन होऊ नये म्हणून जहागीर खान यांनी स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतले. सेवेत असताना खान यांनी जनसामान्यांचे प्रश्नांची सोडवणुकी साठी समाजसेवक म्हणून अनेक असे कार्य केले आहे. पण समाज हित जोपासण्यासाठी अनेक वेळा त्यांना मोठमोठया जण आंदोलनात सहभागी होण्यासाठी अलिप्त राहावे लागायचे शासकीय सेवेत असताना त्यांनी रुग्ण सेवा, महिलांचे प्रश्न,स्वत: च्या समाजाचे प्रश्न ,गरीब गरजूचे प्रश्न,असे अनेक प्रश्न खान हे नियमाचे पालन करून सोडवायचे जेवणाची सुट्टी व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीत ते समाज सेवा करायचे व त्यांनी समाजाच्या हितासाठी स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतली, खान यांनी २४ वर्ष शासकीय सेवा बजावली त्यांची अजून ९ वर्ष सेवा बाकी असताना स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतली ह्या धाडसाचे त्यांचे सवरत्र कौतुक होत आहे.