शिंदखेडा येथे बिजासनी पेट्रोल पंपाचा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ
सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी वानखेडे कुटुंब आदर्श - रावल
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील टेमलाय फाटा होळ रोडवरील बिजासनी पेट्रोल पंपाचा आज माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. हयावेळी सत्यनारायण महापुजा व तिर्थ प्रसादाचे आयोजन केले होते. प्रास्ताविकातुन प्रविण माळी यांनी सांगितले की, मी सर्वसाधारण घरातील कार्यकर्ता असुन मला रावसाहेब अनिल वानखेडे यांनी पंप उभारणी साठी आर्थिक परिस्थिती नसताना ही मदत केली. तसेच आमदार जयकुमार रावल यांनी देखील सहकार्य केले.त्याचप्रमाणे हस्ती बॅकने आर्थिक कर्ज मिळवून देण्यासाठी मला केली त्याबद्दल आभार मानले.

यावेळी आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, इंडियन ऑईलचे वितरक शर्मन व्होरा, अहिर सुवर्णकार औद्योगिक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय जाधव, श्रीराम दुसाणे, शामकांत दुसाणे, रवींद्र दुसाणे, संजय दुसाणे, सुघाकर वानखेडे, दयाराम माळी, हस्ती बॅकेचे शाखाध्यक्ष अॅड.अरुणभाई गुजराथी, मॅनेजर चद्रेश शर्मा, उपनगराध्यक्ष भिला पाटील, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, विनय वानखेडे, राजाराम देवराम माळी, भाजपचे शहराध्यक्ष प्रविण राजाराम माळी यासह नगरसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी आज बिजासनी पेट्रोल पंपचा शुभारंभ झाला. यात मनस्वी आनंद झाला आहे. कारण सर्वसामान्य घराण्यातील भाजपच्या कार्यकर्ता प्रविण माळी यांनी प्रयत्न केलेल्या उद्योग ला रावसाहेब अनिल वानखेडे यांनी उभारी देवुन नवचैतन्य निर्माण केले. सच्चा कार्यकर्ता म्हणून आज खरी पावती मिळाली आहे. या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल दर्जेदार मिळेल अशी ग्वाही दिली आहे. यावेळी शहरातील व परिसरातील मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.सोमनाथ अहिरराव यांनी केले.




