महाराष्ट्र
जि.प सदस्य डोंगरे यांच्या निधीतून ब्लॉग बसवण्याच्या कामाचे उपसरपंच प्रकाश बचुटे यांच्या हस्ते उदघाटन
मोहोळ : आज औंढी येथे विजयराज डोंगरे (जि.प.सदस्य) यांच्या निधीतून ब्लॉग बसवण्याच्या कामाचे उद्घाटन प्रकाश (नाना) बचुटे (उप.सरपंच) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शांतीलाल आबुरे समस्त गावकरी व वारकरी संप्रदाय हा कार्यक्रमासाठी उपस्थित होता. रामनवमी मंदिरात उत्साहात रामनवमीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या कार्यक्रमाला भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब शिंदे उपस्थित होते. तसेच या ब्लॉगचे काम मंजूर करण्यासाठी ज्याने परिश्रम घेतले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे व सर्व गावकरी उपस्थित होते.