ब्रेकिंग
Trending
सरकार मस्त पशुपालक त्रस्त
पोटच्या लेकरा प्रमाणे वागवलेल पशुधन धोक्यात आले असुन त्यामूळे दुग्धव्यवसाय सुध्दा धोक्यात आलेला आहे
चांदुर बाजार (राजेश पडोले) विदर्भ राज्य आंदोलन समिति चांदूर बाजार जिल्हा अमरावती वतिने जनावरावर आलेल्या लंम्पि आजारा संबंधी निवेदन चांदूर बाजार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.चांदूर बाजार तालुक्यास परतीच्या पाऊसामुळे जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.
अशातच जनावरावर आलेल्या लम्पि आजारामुळे शेतकरी,शेतमजुर चिंतातुर झालेला आहे.पोटच्या लेकरा प्रमाणे वागवलेल पशुधन धोक्यात आले असुन त्यामूळे दुग्धव्यवसाय सुध्दा धोक्यात आलेला आहे. तेव्हा तातडिने लसिकरण करुन आर्थिक मदत सरसकट देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतान्ना डिगाम्बर चुनडे,मनोज वासनकर,गजानन इंगोले,शंकरराव चिन्चोळकर ,धन्नजय भाकरे,विनायक ईन्गोले,नानासाहेब वाठोड आदि उपस्थित होते.